समीर वानखेडेंची थेट चेन्नईला बदली

मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंची आता बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या डीजीटीएस म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. मुंबई – कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला क्लिनचिट देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. याप्रकरणात काही चुका […]

समीर वानखेडेंची थेट चेन्नईला बदली

मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंची आता बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या डीजीटीएस म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. मुंबई – कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला क्लिनचिट देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. याप्रकरणात काही चुका आढळून आल्याची कबुली अमली पदार्थविरोधी विभागाने दिली आहे.

आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन तपास अधिकारी विश्व विजय सिंह यांच्यासह आशिष रंजन प्रसाद यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दोघेही संशयास्पद कृतीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर, आरोपांच्या फेर्‍यात अडकलेल्या समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमा क्षुल्क विभागात बदली करण्यात आली होती. एनसीबीतील कार्यकाळ संपल्याने त्यांना मुतदवाढ न देता ही बदली करण्यात आली होती. आता त्यांना थेट चेन्नईला पाठवण्यात आले आहे. वानखडे यांची डीजीटेक्स पेअर्स सर्विसला बदली करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number