अंगणात खेळत असताना चॉकलेटचे आमिष दाखवून 5 वर्षाच्या चिमुकलीवर घरमालकाकडून अत्याचार

संजयनगर परिसरात एका पाच वर्षीय चिमुकलीवर घरमालकाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

अंगणात खेळत असताना चॉकलेटचे आमिष दाखवून 5 वर्षाच्या चिमुकलीवर घरमालकाकडून अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील संजयनगर परिसरात एका पाच वर्षीय चिमुकलीवर घरमालकाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी भाडेकरू म्हणून आलेल्या कुटुंबातील मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत घरात बोलावून घेतलं आणि तिच्यावर अमानुष कृत्य केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. आरोपी शफिक खान हनीफ खान (38) याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

पीडित मुलगी खेळण्यासाठी अंगणात गेली असताना आरोपी एकटाच घरात होता. त्याने चॉकलेट देतो, असं सांगत तिला आत बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने परिसरात भीतीचं आणि संतापाचा वातावरण निर्माण झालं आहे.

मुलीचे आई-वडील शिक्षित असून, तिची आई एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. आरोपीच्या वडिलांची संजयनगर परिसरात चार मजली इमारत असून, विविध मजल्यांवर भाडेकरू राहतात. पीडित मुलीचं कुटुंब पहिल्या मजल्यावर राहतं आणि आरोपी तळमजल्यावर. विश्वासाचं नातं असलेला घरमालकच भक्षक ठरल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी महिला समितीच्या सदस्यांना तात्काळ पाचारण केलं. मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर 'शफिक अंकलने हे केलं,' असं तिने स्पष्ट सांगितलं. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, समाजातून या प्रकरणात आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी, अशी तीव्र मागणी होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number