मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे आक्रमक

मराठा आरक्षणावरून भाजप खासदार संभीराजे पुन्हा आक्रमक झाले हेत. संभाजराजे छत्रपती यांनी याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पुन्हा २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार असल्याची शक्यता आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. […]

मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे आक्रमक

मराठा आरक्षणावरून भाजप खासदार संभीराजे पुन्हा आक्रमक झाले हेत. संभाजराजे छत्रपती यांनी याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पुन्हा २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार असल्याची शक्यता आहे.

भाजप खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाबाबत मविआ सरकार उदासीन असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर केला आहे. राज्य सरकारच्या काही मुद्द्यांच्या विरोधात मी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला, असे संभाजीराजे यांनी जाहीर केले आहे.

संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत मविआसमोर मुद्दे मांडले. सारखी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकारच रक्कम देत नाही. संचालक मंडळ नाही. कर्ज परतावे काढत नसल्याने बँका यापुढे कर्ज मंजूर करणार नाहीत. वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. अनेक वसतीगृहांचे प्रस्तावही प्रलंबित आहेत. कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली असून त्यावर पुढील सुनावणी कधी होणार असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील हे प्रश्न सोडवले नाहीत तर २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number