जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील 288 आमदार बिनकामाचे असल्याची घणाघाती टीका भिडे गुरूजी यांनी केलीये. शिवरायांचे स्मारक उभारण्यावरून त्यांनी आमदारांवर टीका केलीये.
शिवरायांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठीच केला जात असल्याचा आरोप भिडे गुरुजींनी यावेळी केलाय.
प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत, अशी सणसणीत टीका शिवप्रतिष्ठानच्या भिडे गुरूजी यांनी केलीय.
एकीकडे भिडे गुरूजी विधान सभेतल्या आमदारांवर टीका करताये तर दुसरीकडे विधानसभेतील पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांचं कौतुक केलय.