जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भात सामनातून भाष्य करण्यात आलंय.
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आडवाणींच्या मानगुटीवर बाबरीचे भूत बसवून सर्वोच्च न्यायालयानेच एक तगडा स्पर्धक कमी केला.
त्यामुळे मुरली मनोहर जोशी हे सरसंघचालकांच्या गुप्त भेटीस जाऊन काही नवे गणित जुळवीत आहेत काय? अशी ‘गुप्त’ चर्चा उघडपणे सुरू आहे.
सरसंघचालकांनी मनावर घेतले तर काहीही घडू शकते, अर्थात राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही.
आम्ही आमचे मत मोकळेपणाने मांडले आहे व त्यासाठी गुप्त भेटीगाठी घेण्याची गरज नाही.