जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्नाटकी काँग्रेसनं राज्याच्या स्वतंत्र झेंड्याची मागणी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनातून वेगळ्या झेंड्याची मागणी केल्यानंतर कर्नाटकी काँग्रेस पक्षाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
कर्नाटक सरकारची स्वतंत्र झेंड्याची मागणी हा विचार राष्ट्रद्रोहच असून, मोदी सरकारनं त्याला वेळीच ठेचायला हवं, अशी मागणी शिवसेनेनं सामनातून केली.
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-
जम्मू-कश्मीरचा स्वतंत्र झेंडा आधीच हिंदुस्थानी घटनेच्या काळजात घुसला आहे
ती वेदना ठसठसत असतानाच कर्नाटकी काँग्रेसवाल्यांनी हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसला आहे
हा विचार राष्ट्रद्रोहाचाच आहे. आजची स्वतंत्र ध्वजाची आस उद्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी बनू शकते
काट्याचा नायटा होण्याआधीच पंतप्रधान मोदी यांनी ही कीड चिरडून टाकली पाहिजे
राष्ट्रीय एकात्मतेचे धडे फक्त भाषणात, सरकारी जाहिरातींत देऊन चालणार नाही, ती कृतीतून दाखवायला हवी
केंद्र सरकारने एकतर सिद्धरामय्यांचे सरकार बरखास्त करावे नाहीतर कर्नाटक राज्याला केंद्राकडून मिळणारी सर्व मदत तत्काळ थांबवावी