कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा कोण मारतंय?- सामनामधून उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकरी कर्जमाफीवरुन पुन्हा एकदा शिवसेना भाजपमधलं राजकारण रंगलं आहे. सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.   कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण असा प्रश्न संपादकीयमधून उपस्थित करण्यात आला. कर्जमुक्तीच्या विषयावरुन त्यामुळे सेना भाजप पुन्हा आमनेसामने उभं ठाकल्याचं चित्र आहे.   कर्जमुक्तीचं श्रेय उपटणं आणि श्रेय लाटणं हा […]

कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा कोण मारतंय?- सामनामधून उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी कर्जमाफीवरुन पुन्हा एकदा शिवसेना भाजपमधलं राजकारण रंगलं आहे. सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

 

कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण असा प्रश्न संपादकीयमधून उपस्थित करण्यात आला. कर्जमुक्तीच्या विषयावरुन त्यामुळे सेना भाजप पुन्हा आमनेसामने उभं ठाकल्याचं चित्र आहे.

 

कर्जमुक्तीचं श्रेय उपटणं आणि श्रेय लाटणं हा सध्याच्या राजकीय विचारसरणीचाच भाग बनला. पण पब्लिक सब कुछ जानती है या विश्वासावरच जग चाललं असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी संपादकीयमधून लगावला.

 

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-

कर्जमुक्तीसाठी लढले कोण आणि श्रेय घेण्यासाठी पानभर जाहिराती देऊन मजा मारतेय कोण! अर्थात श्रेय उपटणे आणि श्रेय लाटणे हा सध्याच्या राजकीय विचारसरणीचाच एक भाग बनला आहे, पण ‘पब्लिक सब कुछ जानती है’ या विश्वासावरच सध्या जग चालले आहे. निवडणूक तोंडावर आल्यानं 10 रुपयांत भोजन आणि 5 रुपयांत न्याहरीची योजना कर्नाटक सरकारनं आणली त्यामुळे हे विषयांतर.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे राज्य असताना एक रुपयात पोटभर झुणका-भाकरीची योजना सरकारने सुरू केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना झुणका पचनी पडला नाही. त्यांचे सरकार येताच गरीबांच्या तोंडचा झुणका-भाकरीचा घास त्यांनी काढून घेतला. या योजना सामान्य जनतेचे पोट भरणाऱ्या आणि चूल पेटविणाऱया आहेत. झुणका-भाकर केंद्राची योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू करावी व ‘वडापाव’ गाडय़ांची योजना राज्यभरात राबवावी अशी शिफारस आम्ही देवेंद्र सरकारकडे करीत आहोत. वाटल्यास श्रेय वगैरे जे काही आहे ते तुम्हीच घ्या. अशा योजनांतूनच महाराष्ट्राला बरकत व गरीबांना रोजगाराची समृद्धी मिळेल!

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number