‘वाघाला गोंजारणं आता शक्य नाही’, सामनातून भाजपला प्रत्युत्तर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमधून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधलाय. 6 एप्रिलला आयोजित करण्यात आलेल्या भाजप मेळाव्यात अमित शहा यांनी 2019 लोकसभा निवडणूकांसाठी शिवसेनेशी युती करण्याचे संकेत दिले होते. यावरती शिवसेनेच्या वाघाला गोंजारण आता शक्य नाही असे भाजपला सामनामधून प्रत्युत्तर देण्यात आलंय. ”2019चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजप अजूनही 2014 च्या सुवर्णकाळात रमून […]

‘वाघाला गोंजारणं आता शक्य नाही’, सामनातून भाजपला प्रत्युत्तर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमधून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधलाय. 6 एप्रिलला आयोजित करण्यात आलेल्या भाजप मेळाव्यात अमित शहा यांनी 2019 लोकसभा निवडणूकांसाठी शिवसेनेशी युती करण्याचे संकेत दिले होते. यावरती शिवसेनेच्या वाघाला गोंजारण आता शक्य नाही असे भाजपला सामनामधून प्रत्युत्तर देण्यात आलंय.

”2019चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजप अजूनही 2014 च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे. भाजपला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले, तर त्यासाठी जमीन नाही. भाजपने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत!” असं सामना संपादकीयमध्ये म्हटलयं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number