सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा साधला निशाणा; भाजपात वाल्यांची भरती होत असल्याचा लगावला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे.   काय म्हंटलय उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये   – कर्नाटकसारखं राज्य वेगळय़ा झेंडय़ाची मागणी करतंय. काँग्रेस सोडा हो, पण यावर भाजप तरी खवळून उठलाय का? – तिथे तुमच्याच दांडक्यांवर स्वतंत्र निशाण फडकतेय. राजकारणातला हा दळभद्री प्रकार थांबणार तरी कधी? असा सवाल […]

सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा साधला निशाणा; भाजपात वाल्यांची भरती होत असल्याचा लगावला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे.

 

काय म्हंटलय उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये

 

– कर्नाटकसारखं राज्य वेगळय़ा झेंडय़ाची मागणी करतंय. काँग्रेस सोडा हो, पण यावर भाजप तरी खवळून उठलाय का?

– तिथे तुमच्याच दांडक्यांवर स्वतंत्र निशाण फडकतेय. राजकारणातला हा दळभद्री प्रकार थांबणार तरी कधी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय

– हिंदू म्हणून आम्ही ज्यांचं रक्षण केलं, ज्यांच्यासाठी शिवसैनिकांनी छातीवर वार घेतले, पुन्हा त्यांच्यावर संकट आलं तर काय होईल? असा खडा सवालही त्यांनी

विचारला

– भारतीय जनता पक्षात ‘वाल्यां’ची भरती होत आहे. त्यांचे वाल्मीकी झाले तरी ते राममंदिर उभे करू शकतील काय? असा मार्मिक टोला त्यांनी मारलाय.

– तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचे स्वबळाचे सरकार नक्कीच येणार आहे असा आत्मविश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number