अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आजकाल त्याच्या प्रत्येक वक्तव्यामुळे तो बराच चर्चेत असतो. नुकतंच तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अलीकडेच एका कार्यक्रमात सलमानला तेरे नाम चित्रपटाची आठवण झाली . यावेळी बोलताना त्याने ‘तेरे नाम’च्या सिक्वेलबद्दल एक खास खुलासा केला आहे.
अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी किसी का भाई किसी कि जान या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची आठवण काढली.2003 साली प्रदर्शित झालेला सलमानचा ‘तेरे नाम’ हा सिनेमा सुपरहिट झाला. हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर त्यांनी सलमान खानसोबत ‘तेरे नाम 2’ च्या कल्पनेवरही चर्चा केली होती.
दुर्दैवाने सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी दिल्लीत निधन झाले. त्यामुळे अलीकडेच सलमान खानने सांगितले की, सतीश कौशिक त्याच्याकडे 20 वर्षांपूर्वी ‘तेरे नाम’साठी फक्त एका ओळीची कल्पना होती आणि त्यानंतर सलमानला वाटले की ही एक सुपर आयडिया आहे.मग हा चित्रपट खूप गाजला. आज ते जरी या जगात नसले तरीही त्यांनी सलमानला वचन दिले होते ते पूर्ण करण्याचा सलमान नक्की प्रयत्न करेल असेल सलमानने सांगितले. त्याच्या या वक्तव्यांनंतर तेरे नाम २ च्या चर्चांना उधाण आले आहे.