सलमानने घेतली ममता बॅनर्जींची भेट

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचा भाई जान अर्थात अभिनेता सलमान खान अलीकडे त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटासाठी बराच चर्चेत होता. त्यानंतर सलमान आता कोलकता दौऱ्यावर आहे. दरम्यान त्याने कोलकत्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे हे क्षण समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. अभिनेता सलमान खान […]

सलमानने घेतली ममता बॅनर्जींची भेट

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचा भाई जान अर्थात अभिनेता सलमान खान अलीकडे त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटासाठी बराच चर्चेत होता. त्यानंतर सलमान आता कोलकता दौऱ्यावर आहे. दरम्यान त्याने कोलकत्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे हे क्षण समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

अभिनेता सलमान खान शनिवारी दुपारी कोलकाता येथे पोहोचला. दरम्यान त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कालीघाट परिसरातील त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी शाल देऊन सलमानचे स्वागत केले.

सलमान ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या मैदानावर ‘दबंग द टूर रीलोडेड’ या कार्यक्रमासाठी कोलकाताला गेला होता. या सलमानसाठी या कार्यक्रमात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनीही स्वतंत्रपणे विशेष बंदोबस्त ठेवलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number