वाजपेयींना उशिरा श्रद्धांजली, सलमान खान झाला ट्रोल

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई बॉलिवूड स्टार सलमान खानला पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी त्यच्या ट्रोलचं कारण ठरलंय ते म्हणजे त्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहायला केलेला उशीर. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट रोजी झालं. यावर अनेक लोकांनी तसेच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सलमान […]

वाजपेयींना उशिरा श्रद्धांजली, सलमान खान झाला ट्रोल

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

बॉलिवूड स्टार सलमान खानला पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी त्यच्या ट्रोलचं कारण ठरलंय ते म्हणजे त्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहायला केलेला उशीर. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट रोजी झालं. यावर अनेक लोकांनी तसेच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सलमान खानने मात्र चक्क चार ते पाच दिवसांनी म्हणजे 21 ऑगस्टला वाजपेयींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. याबद्दल सलमानवर टिकेचा भडिमार होतोय.

सलमान खानने मंगळवारी एक ट्विट करत देशानं एका मोठ्या व्यक्तीला गमावलं असल्याचं म्हटलं आहे. 

 

मात्र, इतक्या मोठ्या घटनेबद्दल एवढ्या उशिरा जाग आल्याबद्दल ट्विटरातींनी सलमानला चांगलंच ट्रोल केलं आहे. 

 

 

कुणी सलमानला खोचकपणे विचारलंय की ‘तुमच्याकडे नेमकं कोणतं वर्तमानपत्र येतं?’ तर कुणी ‘टायगर सो रहा था’ अशी प्रतिक्रिया देत टर्र उडवली आहे.

‘जर अटलजींना श्रद्धांजली देण्यासाठी इतका उशीर होत असेल, तर या हिशेबाने केरळच्या पूरग्रस्तांबद्दल व्यक्त व्हायला किती दिवस घेणार’ असा प्रश्न सलमानला विचारला आहे.

Bhai Ko koi Kerala ki news batao. Kahi phir sa na late hojaya.

— RAJESH SAH (@Rajeshsah87) August 21, 2018

 

एवढंच नव्हे तर नेटकऱ्यांनी सलमानला त्याच्या ट्विटमध्ये झालेल्या शब्दांच्या चुका देखील दाखवून दिल्या आहेत. फीलिंगच्या शब्द लिहिताना फीइंग असं स्पेलिंग लिहिल्यामुळेही ट्विपल्सनी त्याला ट्रोल केलं आहे. 

 

तर काही लोकांनी दस का दम या आपल्या शोचे अपडेट्स देताना तू उशीर करत नाहीस, पण देशातल्या मोठ्या घटनांच्या बाबतीत तुला उशीर का होतो? असं विचारलं आहे. थोडक्या सलमानच्या या उशिरा केलेल्या ट्वीटमुळे नेटिझन्सच्या हाती आयतं कोलीत लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number