अभिनेत्री पूजा डडवालला, सलमानची मदत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉलिवूडचा भाईजान अर्थातचं सलमान खान अडचणीत असलेल्या अनेकजणांना मदत करत असतो. सलमान अभिनेत्री पूजा डडवालच्या मदतीला देखील धावून आला आहे. ‘वीरगती’ या सिनेमातील सलमानची सहकलाकार पूजा डडवाल सध्या टीबी आजाराशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने एका व्हिडिओच्या माध्यमातून सलमानकडे आर्थिक मदतीसाठी याचना केली होती. सलमानने आता पूजाला मदतीचा हात दिला […]

अभिनेत्री पूजा डडवालला, सलमानची मदत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडचा भाईजान अर्थातचं सलमान खान अडचणीत असलेल्या अनेकजणांना मदत करत असतो. सलमान अभिनेत्री पूजा डडवालच्या मदतीला देखील धावून आला आहे.

‘वीरगती’ या सिनेमातील सलमानची सहकलाकार पूजा डडवाल सध्या टीबी आजाराशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने एका व्हिडिओच्या माध्यमातून सलमानकडे आर्थिक मदतीसाठी याचना केली होती. सलमानने आता पूजाला मदतीचा हात दिला आहे. सलमानची ‘बिईंग ह्यूमन’ ही संस्था पूजाचा उपचाराचा सर्व खर्च करणार आहे.

पूजा डडवाल सध्या टीबी आणि फुफ्फुसाच्या आजाराशी लढत आहे. गेली काही वर्ष पूजा गोव्यात कॅसिनो मॅनेजमेंट करत होती. मात्र आपल्याकडे एकही पैसा नसल्याचा दावा तिने केला आहे. चहा पिण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागत असल्याचं पूजा सांगते. पूजाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून तिच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत. गेल्या 15 दिवसांपासून ती मुंबईतील शिवडीमधल्या रुग्णालयात  उपचारांसाठी  दाखल आहे.

सहा महिन्यांपूर्वी पूजाला टीबीचं निदान झालं. आजारपणात पूजाकडे तिच्या कुटुंबियांनीही पाठ फिरवली आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आर्थिक मदतीसाठी पूजाने आपला व्हिडिओ तयार केला होता. तो पाहून सलमान संपर्क करेल, याची खात्री तिला होती. सिंदूर की सौगंध, हिंदुस्तान, इंतकाम यासारख्या सिनेमात पूजाने अभिनय केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number