मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : अलीकडेच अभिनेता सलमान खा यांचा भाचीसोबतच एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. अशातच सलमान ची एक पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सलमान खान हा समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतो आणि आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच वेगवेगळे फोटो पोस्ट करत असतो. अशातच आता त्याच्या नवीन पोस्टमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
अभिनेता सलमान खान याने नुकतेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी पोस्ट केली आहे. या सेल्फीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं रात्री १ वाजता सेल्फी काढून तो ट्विटरवर आणि इंस्टग्रामवर सामायिक केला. आता भाईजानचा फोटो पाहिल्यावर चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर कोणी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.


