जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानसह इतर कलाकारांबाबत आज जोधपूरचं कोर्टाने सुनावणी केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सलमानसह इतर कलाकारही बुधवारी जोधपूरमध्ये दाखल झाले हेते. ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान रात्री सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला होता. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला.

त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत. त्यामुळे गुरुवारी कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या प्रकरणी जोधपूर कोर्टाने सलमानला दोघी ठरवले आहे. तर, या खटल्यात सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम निर्दोष म्हणून मुक्तता देण्यात आली आहे. सलमानला दोषी ठरवल्यानंतर त्याला काय शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सलमानच्या सुटकेसाठी त्याचे चाहते देवाकडे साकड घालत आहेत. तसेच, सलमानला शिक्षा सुनावली तर ती कमीत कमी असावी अशी मागणीदेखील सलमानचे चाहते कोर्टाकडे करत आहेत.