दोन दिवसांच्या तरुंगवासानंतर ‘टायगर’ घरी परतला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तब्बल 20 वर्षांनंतर काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले होते. त्याचबरोबर 10 हाजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर सलमानचा जामीनही मंजूर करण्यात आला. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सलमानला जोधपूर सत्र न्यायालयाकडून जामीन देण्यात आला. अखेर दोन दिवसांच्या तुरुंगवासानंतर सलमान घरी […]

दोन दिवसांच्या तरुंगवासानंतर ‘टायगर’ घरी परतला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तब्बल 20 वर्षांनंतर काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले होते. त्याचबरोबर 10 हाजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर सलमानचा जामीनही मंजूर करण्यात आला. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सलमानला जोधपूर सत्र न्यायालयाकडून जामीन देण्यात आला.

अखेर दोन दिवसांच्या तुरुंगवासानंतर सलमान घरी परतलाय. विशेष विमानाने सलमान मुंबईत दाखल झालाय. अखेर सलमान मुंबई वांद्रेजवळील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या घरी परतला आहे. सलमानच्या परतण्याने त्याच्या चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय. दुपारपासूनच चाहत्यांनी सलमानच्या घरासमोर गर्दी केली आहे. सलमान येताच चाहत्यांनी फटाके फोडून त्याचे स्वागत केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number