बाजार समितीत सडक्या कांद्याची विक्री

नवी मुंबई, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: नवी मुंबईतील एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. व्यापाऱ्यांनी कचऱ्यात फेकून दिलेले सडलेले कांदे बटाटे रस्त्यावरील विक्रेते निवडून घेऊन जात असून त्याची मॅफको मार्केट येथे रस्त्यावर विक्री करण्यात येते असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. ऐन पावसाळ्यात कचऱ्यात टाकून दिलेले कांदे बटाटे तेथेच असलेल्या घाणीच्या पाण्यात […]

बाजार समितीत सडक्या कांद्याची विक्री

नवी मुंबई, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: नवी मुंबईतील एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. व्यापाऱ्यांनी कचऱ्यात फेकून दिलेले सडलेले कांदे बटाटे रस्त्यावरील विक्रेते निवडून घेऊन जात असून त्याची मॅफको मार्केट येथे रस्त्यावर विक्री करण्यात येते असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय.

ऐन पावसाळ्यात कचऱ्यात टाकून दिलेले कांदे बटाटे तेथेच असलेल्या घाणीच्या पाण्यात धुवून नंतर त्याची विक्री केली जातेय. याला एपीएमसीच्या सुरक्षा रक्षकांची देखील साथ मिळत आहे कारण एपीएमसी आवारातून सामान बाहेर घेऊन जाताना गेट पास लागतो मात्र चिरीमिरी पैसे घेऊन हे सुरक्षारक्षक कचऱ्यातील कांदे बटाटे घेऊन जाण्यास परवानगी देत असल्याचे समोर येतंय. त्यामुळे रस्त्यावरील कांदे बटाटे घेत असाल तर नक्की सावध व्हा अन्यथा आजाराला स्वतःहून आमंत्रण द्याल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number