Sakinaka Manhole Tragedy : त्या दुर्घटनेची होणार उच्चस्तरीय चौकशी, सहायक आयुक्तांसह चौघे निलंबित; कंत्राटदाराला टाकलं काळ्या यादीत; पालिका आयुक्तांची कठोर कारवाई

मुंबई : साकीनाका येथील खैरानी मार्गावरील मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (वय 55 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक […]

Sakinaka Manhole Tragedy : त्या दुर्घटनेची होणार उच्चस्तरीय चौकशी, सहायक आयुक्तांसह चौघे निलंबित; कंत्राटदाराला टाकलं काळ्या यादीत; पालिका आयुक्तांची कठोर कारवाई

मुंबई : साकीनाका येथील खैरानी मार्गावरील मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (वय 55 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांच्यावर चौकशीसापेक्ष निलंबाची कारवाई केली आहे. तसेच सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मृताच्या वारशाला महापालिकेतर्फे 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 

हेही वाचा : Vasant More Pune : तात्या काय चाललंय? सचिन अहिर फुटल्यानंतर मला थेट संजय राऊतांचा फोन : वसंत मोरे

रस्त्यावर चालताना अचानक मॅनहोलमध्ये पडलेल्या असलम इसाक शेख यांना काढण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. काही कालावधीनंतर असलम इसाक शेख यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, राजावाडी रुग्णालयात श्रवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह आणण्यात आला असून रुग्णालयात असलम शेख यांचे नातेवाईक दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, असलम इसाक शेख माथाडीचे काम करत असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा बेरोजगार असून कामाच्या शोधात असून असलम इसाक शेख यांच्या कामावरच त्यांचे कुटुंबाचे पालनपोषण होत असे. या गंभीर घटनेची मुंबई महापौर रितू तावडे यांनीदेखील दखल घेतली असून त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number