जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील साकीनाका येथे खैराणी रोडवरील फरसानच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत 12 कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजते.
‘भानु फरसान’ या कारखान्याला पहाटे 4.30 च्या सुमारास ही आग लागली. आगीनंतर दुकानाच्या बाहेर झोपलेले कामगार पळून गेले, मात्र जे कामगार आत झोपले होते, ते आतच राहिले.
त्यातच आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आत अडकलेल्या कामगारांना बाहेर पडणं अवघड झालं.
सध्या आगीवर नियंत्रण मिळालं आहे. मात्र या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.