मुंबई, २९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील हॉट, बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आता तर बॉलिवूडमध्येही तिचा बोलबाला आहे. सध्या सिनेसृष्टीत तिचीच चर्चा आहे. सई बिनधास्त अभिनेत्री. त्यामुळे तिचं खाजगी आयुष्य कधीच लपून राहिलेलं नाही. आपल्या खासगी आयुष्याबद्दल सई बिनधास्त बोलते. सईच्या प्रेमप्रकरणाच्या बऱ्याच चर्चा रंगताना दिसतात.२०१३साली सईची अमेय गोसावी सोबत लग्नगाठ बांधली. मात्र तीचं हे लग्न फार काळ टिकलं नसून दोघांनी २०१५मध्ये घटस्फोट घेतला.
नुकतच तिचं एक वक्तव्य समाज माध्यमांवर चांगलंच चर्चेत आहे. सई मुलाखतीत म्हणाली, “आताही मी माझ्या पहिल्या पतीला भेटते. ते क्षण मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. आजही मी त्याच्याशी बोलते. ज्यावेळी आम्ही घटस्फोट घेतला तेव्हा आम्ही दोघांनी जंगी पार्टी केली होती. आमचे मित्रमैत्रिणीदेखील सहभागी झाले होते. असे सई म्हणाली. तिचे हे वक्तंव्य ऐकून चाहते चांगलेच चकित झाले.सईने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा मित्र अनिश जोग सोबतचा फोटो सामायिक केला होता.
तेव्हा सईने अनिशच्या गालावर हात देखील ठेवला होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनिश जोग चित्रपट निर्माता आहे. अनिश याने आतापर्यंत ‘टाईमप्लीज’, ‘व्हायझेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’ या सिनेमांची निर्मिती केली. सई आणि अनिश एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. शिवाय दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर सई आणि अनिश यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.