मराठी चित्रपटांमध्ये स्वतःचं महत्त्वाचं आणि वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचं सभासत्व स्वीकारलं.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख उपस्थित होते.
सन 2016 मध्ये रिलीज झालेला ‘सैराट’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रूपयांची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट बनला.
‘सैराट’ची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीलाही पडली. करण जोहरने ‘धडक’ या चित्रपटाच्या रूपात ‘सैराट’ची हिंदीत निर्मिती केली. या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर झळकले होते.
मनसे चित्रपट चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सैराट चित्रपटाच्या कलाकारांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, नवोदित अभिनेता आकाश ठोसर आणि नवोदित अभिनेत्री रिंकू राजगुरू ह्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं’ सदस्यत्व, चित्रपट सेनेचे अध्यक्ष @MNSAmeyaKhopkar ह्यांच्या उपस्थितीत स्वीकारलं. सर्व कलाकारांचं मनसे स्वागत. ? pic.twitter.com/fviuUhgz5j — MNS Adhikrut (@mnsadhikrut) September 11, 2018