संत तुकाराम महाराज बीज यात्रा साजरी

प्रति देहू समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव मोठया उत्साहात पार पडला. जवळपास ८० हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. तुकाराम बीजेनिमित्त डोर्लेवाडीत मोठी यात्रा भरते. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. गुरवारी सकाळी कीर्तन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता पुष्प वर्षाव करत बीज उत्सव साजरा करण्यात आला. […]

संत तुकाराम महाराज बीज यात्रा साजरी

प्रति देहू समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव मोठया उत्साहात पार पडला. जवळपास ८० हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. तुकाराम बीजेनिमित्त डोर्लेवाडीत मोठी यात्रा भरते. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. गुरवारी सकाळी कीर्तन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता पुष्प वर्षाव करत बीज उत्सव साजरा करण्यात आला. या बीज उत्सवाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील हजेरी लावली होती.

देहूनंतर डोर्लेवाडीत तुकाराम बीज सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे ६४ वे आहे. तुकाराम बीजउत्सवानिमित्त मंदिरात विशेष बैठक घेण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number