संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेत वारकऱ्यांचा मेळा

नाशिच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. मोठ्या भक्तीभावात आज त्र्यंबक नगरी नाहून निघाली आहे. यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज, पहाटे राज्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील […]

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेत वारकऱ्यांचा मेळा

नाशिच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. मोठ्या भक्तीभावात आज त्र्यंबक नगरी नाहून निघाली आहे. यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज, पहाटे राज्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला. टाळमृदुंगाचा गजर, रंगफुलांची उधळण यांसह हजारो वारकऱ्यांच्या उत्साहात संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा पार पडणार आहे.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही वैष्णव संप्रदायाची आद्यप्रवर्तन भूमी असून संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे यात्रा-उत्सवानिमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वागत करण्यात येते. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या दिंड्यांद्वारे अभंग – कीर्तन केले जाते

यंदा कोरोना निर्बंधमुक्तीमुळे मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरातून चारशे दिंड्या आणि जवळपास तीन लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरला मुक्कामी पोहोचले आहेत. जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिकच्या अंजनेरी ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात व गोदातिरी मोठ्या भक्तीभावात ही यात्रा संपन्न होत आहे. गेले दोन दिवस इथं वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजून गेलेली पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number