सैफला न्यायालयाचा दणका

 मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : बॉलिवूडचे खान हे नेहमी चर्चेत असतात. तर आता अभिनेता सैफ अली वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सैफच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेता सैफ अली खानचा ११ वर्षांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकासोबत वाद झाला होता. या प्रकरणात साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याच्यावर […]

सैफला न्यायालयाचा दणका

 मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : बॉलिवूडचे खान हे नेहमी चर्चेत असतात. तर आता अभिनेता सैफ अली वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सैफच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अभिनेता सैफ अली खानचा ११ वर्षांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकासोबत वाद झाला होता. या प्रकरणात साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याच्यावर अतिरिक्त आरोप निश्चित केले आहेत. यावर लवकरच दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी केली जाणार आहे. सदर प्रकरणामुळे याआधी २०१७ मध्ये सैफने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर अतिरिक्त आरोप निश्चित करण्याच्या विरोधात सत्र न्यायालयात देखील धाव घेतली, परंतु २०१९ मध्ये न्यायालयाने ही याचिका फेटाळली.त्यांनतर आता त्याच्यावरील आरोप निश्चित झाले आहेत.

22 फेब्रुवारी 2012 रोजी सैफ अली खान आणि तक्रारकर्ते व्यावसायिक इक्बाल शर्मा त्यांच्या मित्रांसोबत फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवत असताना त्यांच्यात भांडण झाले. हे भांडण इक्बाल शर्मा यांनी सैफ अली खान आणि त्याच्या मित्रांना मोठ्याने बोलण्यावर आक्षेप घेतल्याने झाले होते.यानंतर सैफने इक्बाल आणि त्याचे सासरे रमणभाई यांना धमकी दिली. यात सैफ ने इक्बालला धक्काबुक्की केली, त्यामुळे त्याच्या नाकाला दुखापत झाली. त्यांनतर इक्बालने सैफ विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणावर अद्याप सैद ची काही प्रतिक्रिया आलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number