‘कुस्ती’च्या आखाड्यात सई ताम्हणकरची ‘दंगल’!

कला आणि क्रीडा यांची एकमेकांशी संगत आता नवी नाही. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी क्रीडाप्रकारांशी संबंधित चित्रपटांत काम केलंय. एवढंच नव्हे, तर शाहरूख खान, प्रीटी झिंटा, शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी आयपीएल क्रिकेट टीम्स खरेदी केल्या आहेत. अभिषेक बच्चनने कबड्डी टीम विकत घेतली आहे. मात्र बॉलिवूडपाठोपाठ पहिल्यांदाच एक मराठी अभिनेत्रीदेखील स्वतःची एक टीम विकत घेत आहे. ही […]

‘कुस्ती’च्या आखाड्यात सई ताम्हणकरची ‘दंगल’!

कला आणि क्रीडा यांची एकमेकांशी संगत आता नवी नाही. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी क्रीडाप्रकारांशी संबंधित चित्रपटांत काम केलंय. एवढंच नव्हे, तर शाहरूख खान, प्रीटी झिंटा, शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी आयपीएल क्रिकेट टीम्स खरेदी केल्या आहेत. अभिषेक बच्चनने कबड्डी टीम विकत घेतली आहे. मात्र बॉलिवूडपाठोपाठ पहिल्यांदाच एक मराठी अभिनेत्रीदेखील स्वतःची एक टीम विकत घेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या कुस्ती लीगमध्ये कोल्हापूर मावळे ही कुस्तीची टीम विकत घेतली आहे. स्वतःच्या मालकीची स्पोर्ट्स टीम विकत घेणारी सई ताम्हणकर ही पहिली अभिनेत्री आहे. या कुस्ती लीगमध्ये असलेल्या टीम ओनर्समध्ये आपण एकमेव महिला ओनर असल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया सईने यावर दिली आहे. कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरीच. त्यामुळे कोल्हापूर मावळे ही एक तगडी टीम सईने खिशात घातली आहे.

याबद्दल घोषणा करताना सई म्हणाली, “मी मूळची सांगलीची असल्यामुळे माझी कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेशी चांगली ओळख आहे. पैलवानांची जीवनशैली, कोणत्या डावाला काय म्हणतात आणि कोणता डाव कधी टाकावा याचं मला चांगलं ज्ञान आहे. हे ज्ञान अशा पद्धतीने उपयोगी पडेल, असं कधी वाटलं नव्हतं. आपली परिस्थिती नसल्याने आपल्याला चांगलं व्यासपीठ मिळालं नाही, अशी तक्रार यापुढे कोणत्याही कुस्तीपटूने म्हणू नये, हाच माझा टीमखरेदीमागचा उद्देश आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, यासाठी माझा प्रयत्न असेल.”

 

कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं फार घट्ट आहे. इथल्या तांबड्या मातीत आजही अनेक कुस्तीपटू कसरत करतात. त्यामुळे ‘कोल्हापूर मावळे’ ही एक तगडी टीम सईने घेतल्यावर इतर संघांना सई धोबीपछाड देणार का हे लवकरच पाहायला मिळेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number