जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने सरसकट शेतकरी कर्जमाफी केली नाही असा गौप्यस्फोट राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलाय.
तसेच ज्यांनी सहकार बुडवले त्यांनी सहकार बुडत असल्याचा आरोप हा किव आणणारा असल्याची टीका देशमुख यांनी विरोधकांवर केलीय.
संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार आहे. पण, त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.