जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
अभिनेत्री सागरिका घाटगे आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिलिंद उके दिग्दर्शित मान्सून फुटबॉल या सिनेमातून सागरिका झळकणार आहे. या सिनेमात सागरिका गृहिणींची भुमिका साकारणार आहे. संसार सांभाळता – सांभाळता फुटबॉलची टीम स्थापन करणाऱ्या गृहिणीची ही कथा आहे. या सिनेमात सागरिका फुटबॉलही खेळताना दिसणार आहे.
येत्या जुलैपासून या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. याआधी सागरिकाने शाहरुख खानसोबत चक दे इंडिया या सिनेमात काम केलं आहे. क्रीडा विषयाशी संबंधित हा तीचा दुसरा सिनेमा असणार आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सागरिका क्रिकेटपटू झहीर खानसोबत विवाहबध्द झाली.
लग्नानंतर तीचा हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चक दे इंडियासारखा धुवा मान्सून फूटबॉल बॉक्स ऑफिसवर उडवणार का हे बघण्यासारखं असेल.