सदाभाऊ खोत विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

रयतक्रांती मोर्चाचे नेते सदाभाऊ खोत हे विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचा पाठिंबा असलेले खोत हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपचे पाच आणि अपक्ष सदाभाऊ खोत अशाप्रकारे भाजप एकूण सहा जागा लढवणार आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत विधानसभेची निवडणूक […]

सदाभाऊ खोत विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

रयतक्रांती मोर्चाचे नेते सदाभाऊ खोत हे विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचा पाठिंबा असलेले खोत हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपचे पाच आणि अपक्ष सदाभाऊ खोत अशाप्रकारे भाजप एकूण सहा जागा लढवणार आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावे जाहीर करण्यात आली आहे. या उमदेवारीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपाच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. तसेच शिवसेना खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number