जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आता नव्या वाटेवर पाऊल टाकलं. भविष्यकाळात झेंडा पण आमचाच आणि काठी पण आमचीच पण त्याला दोरीही आमचीच असेल असं सदाभाऊ खोत यांनी ठणकावून सांगितलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर काढल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी पहिल्यांदाच जय महाराष्ट्रवर ही भूमिका बोलून दाखवली. माझी हकालपट्टी करणाऱ्यांनी स्वत:ची उंची तपासावी अशी टीकाही त्यांनी केली. माझ्यासोबत जे झालं ते कोणासोबत होऊ देणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं.