जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
येवला तालुक्यातील शेतकरी संपाला हिंसक वळण, पोलिसांनी पाण्याचा फवारा वापरूनन आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकांनी सुरु केली.
दगडफेक, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या फोडल्या.
दरम्यान, शेतकऱ्यांबरोबर चर्चा करायला सरकार तयार आहे. त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. चर्चेतून सगळे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे रस्त्यावर दूध,भाज्या फेकून देणे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं.