जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मंगळवारी दत्तक घेतलेल्या गावाला भेट देणार आहेत. आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत सचिननं उस्मानाबादमधील डोंजा गाव दत्त घेतलंय.
या गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी सचिन या गावाला भेट देणार आहे. त्यामुळे डोंजा गावात सचिनच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय.
दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्यात आणि गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. सचिन फक्त विकासकामांची पाहणी करणार नाही, तर ग्रामस्थांसोबत संवाद साधणार आहे. तसेच, त्यांच्यासोबत क्रिकेटही खेळणार आहेत.