जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रिपाईचे सचिन खरात कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणी आक्रमक झालेत. त्यांनी मंत्रालयाबाहेर अनोखे आंदोलन केलय.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना तात्काळ अटक करा, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रिपाईचे सचिन खरात यांनी केलीय.
पोटावर थुंकदाणी आणि पाठिमागे झाडू बांधून रिपाईच्या सचिन खरातांनी आंदोलन केलय.