जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेत नाशिक जिल्हा प्रथम असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
येत्या 15 ऑगस्ट रोजी केवायएस मशिन जिल्ह्यात अनेक भागात बसवलं जाणार असून या मशिनच्या माध्यमातून ऑनलाइन सातबारा मिळणं शक्य होणार आहे.
एवढंच नाही तर या मशिनच्या मदतीनं तिकिट बुकींगपासून, सातबारा मिळण्यापर्यंत आणि रेल्वे रिझर्व्हेशनपासून ते मोबाईल रिचार्जपर्यंतचे सगळे काम होणार असल्याची
माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली.
दरम्यानक, ऑनलाइन सेवा पुरवण्यात नाशिक जिल्हा राज्यात पहिला असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिका-यांनी दिली. येत्या काही दिवसात सेतू कार्यालयासोबतच
इतरही विभाग पुर्णपणे ऑनलाइन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.