रशिया-युक्रेन युद्धामुळे डाळींच्या किंमतीत वाढ

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. या युद्धामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली असून आता डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. डाळींच्या किंमतीत ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली असन किरकोळ महागाईचा दर ६ टक्के तर घाऊक महागाई दर १३ टक्के झाला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित करण्यात सरकारला यश […]

रशिया-युक्रेन युद्धामुळे डाळींच्या किंमतीत वाढ

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. या युद्धामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली असून आता डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. डाळींच्या किंमतीत ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली असन किरकोळ महागाईचा दर ६ टक्के तर घाऊक महागाई दर १३ टक्के झाला आहे.

कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित करण्यात सरकारला यश आले आहे. मात्र, महागाई नियंत्रित ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी महागाईच्या दराने उच्चांक गाठला आहे. किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांवर पोहोचला आहे तर घाऊक महागाई १३ टक्के झाली आहे.

भारत देश रशिया आणि युक्रेन या दोन देशांतून मोठ्या प्रमाणात सूर्यफूलाचे तेल आयात करतो. मात्र, या दोन्ही देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा पामतेल उत्पादकांना होणार आहे. तसेच या युद्धामुळे सोयाबीन तेलाच्या किंमतीत १० टक्के वाढ होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number