युक्रेनचा अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात

रशिया-युक्रेन युद्धाच्या चौदाव्या दिवशी रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. या युद्धात रशियाने युक्रेनच्या झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला होता. दरम्यान हा झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आले असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. युक्रेनमधील झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. रशिया-युक्रेनच्या नवव्या दिवशी रशियाने युक्रेनच्या झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला […]

युक्रेनचा अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात

रशिया-युक्रेन युद्धाच्या चौदाव्या दिवशी रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. या युद्धात रशियाने युक्रेनच्या झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला होता. दरम्यान हा झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आले असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. युक्रेनमधील झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो.

रशिया-युक्रेनच्या नवव्या दिवशी रशियाने युक्रेनच्या झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला होता. तर या हल्ल्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाला भीषण आग लागली होती. या प्रकल्पाला आग लागल्यामुळे हल्ला थांबवण्याचे आवाहन युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमो कुलेबा यांनी केले होते. मात्र, अखेर रशियाने युक्रेनचा झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला असल्याचे रशियाच्या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. तसेच हा प्रकल्प पूर्णपणे रशियाच्या ताब्यात असून येथील काम व्यवस्तित सुरू असल्याचेही रशियाने म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरू आहे. रशिया-युक्रेनमध्ये तीन वेळा चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. तर रशियाची युक्रेनवर तीव्र चढाई सुरूच आहे.

‘आता करणार रणगाड्यांनी चढाई’

युद्धाच्या चौदाव्या दिवशी रशियाने आपला हल्ला अधिक तीव्र करत आता रणगाड्यांच्या सहाय्याने रशिया युक्रेनची शहरे काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या दृष्टीने आता रशियाने रणगाडे उतरवत आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number