रशियाने युक्रेनवर टाकला ५०० किलोचा बॉम्ब

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले सुरू आहेत. या युद्धामध्ये युक्रेनची मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. अशातच, रशियाने युक्रेनवर ५०० किलोचा बॉम्ब टाकला असल्याचा दावा युक्रेनच्या मंत्र्यांनी केला आहे. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या बॉम्बचा फोटो शेअर केला आहे. रशियाकडून युक्रेनवर झालेल्या युद्धात युक्रेनमधील अनेक शहरे उध्वस्त झाली असून अनेक नागरिक […]

रशियाने युक्रेनवर टाकला ५०० किलोचा बॉम्ब

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले सुरू आहेत. या युद्धामध्ये युक्रेनची मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. अशातच, रशियाने युक्रेनवर ५०० किलोचा बॉम्ब टाकला असल्याचा दावा युक्रेनच्या मंत्र्यांनी केला आहे. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या बॉम्बचा फोटो शेअर केला आहे.

रशियाकडून युक्रेनवर झालेल्या युद्धात युक्रेनमधील अनेक शहरे उध्वस्त झाली असून अनेक नागरिक मरण पावले आहेत. त्यातच रशियाने युक्रेनवर ५०० किलोचा बॉम्ब टाकला असल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. पूर्व युक्रेनमधील चेर्निहाइव्ह शहरातील एका इमारतीवर हा बॉम्ब टाकण्यात आला. मात्र, सुदैवाने या बॉम्बचा स्फोट झाला नसल्याची माहिती युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी ट्विट करत दिली आहे.

रशियाचे टार्गेट काय? युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे ट्विट

‘शत्रू युक्रेनवर आक्रमण सुरू ठेवत आहे. त्यांचे टार्गेट कीव, खारकीव, चेर्निहाइव्ह, सुमी आणि मायकोलायव्हला ताब्यात घेणे हे आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून १५ लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे. युक्रेन वारंवार पाश्चात्य देशांना नो-फ्लाय झोन लागू करण्याचे आवाहन करत आहे. मात्र ते ही मागणी मान्य करत नाहीत.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number