रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील प्रसार माध्यमांवर बंदी घातली आहे. रशियात फेसबुक आणि ट्विटरला बंदी घातली आहे. सोशल मिडीयाद्वारे रशियन कंपन्यांना भेदभावाची वागणूक दिल्याचा आरोप रशियाने केला आहे.
प्रसार माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा प्रयत्न आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मॉस्कोने देशात ट्विटर आणि यूट्यूबसह फेसबुक ब्लॉक केले आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रशियन कंपन्यांना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे रशियाने आपल्या या निर्णयामुळे लोकांना विश्वासनीय माहितीपासून वंचित ठेवल्याचे फेसबुकने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ऑक्टोबर २०२०पासून फेसबुक विरुद्ध भेदभावाची २६ प्रकरणे समोर आली आहेत. ही माहिती रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सीने दिली आहे. मायक्रोसॉफ्टने रशियामध्ये आपल्या नवीन उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. यासोबतच इतर देशही रशियावर सातत्याने बंदी घालत आहेत.
रशियाकडून युक्रेनमध्ये काही काळासाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.३० वाजल्यापासून युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.