गेल्या काही दिवसांपासून रुपयाच्या घसरणीची मालिका सुरूच आहे.
आजही रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इतिहासात पहिल्यांदा भारतीय रुपयाने 73 रुपयांची पातळी ओलांडली आहे.
यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाची किंमत 73.23 पैसे इतकी झाली आहे.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर रुपयाच्या किमतीमध्ये ही घसरण झाली आहे.