रुबिना दिलैकला कोरोनाची लागण

कोरोनाच्या दुसऱ्याने अनेकांचे मृत्यू झाले आहे. कोरोनाने देशात थैमान घातला आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय अनेक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. कलाकारसुद्धा यापासून वाचले नाहीत. छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस 14’ची विजेती अभिनेत्री रुबिना दिलैकला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. रुबिनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. रुबिनाने […]

रुबिना दिलैकला कोरोनाची लागण

कोरोनाच्या दुसऱ्याने अनेकांचे मृत्यू झाले आहे. कोरोनाने देशात थैमान घातला आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय अनेक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. कलाकारसुद्धा यापासून वाचले नाहीत. छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस 14’ची विजेती अभिनेत्री रुबिना दिलैकला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. रुबिनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

रुबिनाने आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आपली कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. ‘बिग बॉस 14’ मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली रुबिना दिलैकने म्हटलं आहे, ‘मी नेहमी प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पाहते, यामध्ये सुद्धा तसचं आहे. मी हा विचार करत आहे, आता एका महिन्यानंतर मी सुद्धा ‘प्लाज्मा’ डोनेट करण्यास पात्र ठरेन’. माझा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे येत्या 17 दिवस मी होम क्वारंटाईन असणार आहे. तसेच या 5 ते 6 दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी’. रुबिनाने सोशल मीडियावरून ही माहिती कळवताचं रुबिनाचे मित्र आणि सह-कलाकार चिंता करू लागले आहे. आणि तिला काळजी घे असा सल्ला देखील दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number