जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास पालिकेनं नियमित केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींना पी दक्षिण पालिका वॉर्ड कार्यालयाचे पद निर्देशित अधिकारी आणि सहायक अभियंता यांनी पत्राद्वारे देलीय.
अमिताभ बच्चन आणि अन्य लोकांनी केलेल्या अनधिकृत बांधाकामास एमआरपी कायद्या अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती.
5 जानेवारी 2017मध्ये मंजूर आराखड्यात नसलेल्या बाबी मंजूर करण्याकामी सुधारित आराखडे मंजुरीकरिता कार्याकारी अभियंता, इमारत प्रस्ताव, पी विभाग यांच्याकडे सादर केले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता, इमारत प्रस्ताव, पी विभागाकडून अनधिकृत काम नियमित करण्यात आले. अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणी, ओबेरॉय रियालिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी अश्या 7 लोकांना मंजूर आराखडयानुसार आढळून आलेल्या अनियमितता पूर्ववत करण्यासाठी एमआरटीपीची नोटीस 7 डिसेंबर 2016 बजावली होती.