शाळांची छतगळती थांबणार

ठाणे, २७ जून २०२३, प्रतिनिधी: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे डिजिटलायझेशन करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र असे असतान, अनेक शाळांची छपर तसेच दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. अशा नादुरुस्त १७७ शाळांच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ कोटींचा निधी मजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या शाळा […]

शाळांची छतगळती थांबणार

ठाणे, २७ जून २०२३, प्रतिनिधी: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे डिजिटलायझेशन करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र असे असतान, अनेक शाळांची छपर तसेच दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. अशा नादुरुस्त १७७ शाळांच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ कोटींचा निधी मजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या शाळा चकाचक होणार आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष टॅबद्वारे प्रशिक्षण घेत आहे. मात्र. या हायटेक आणि डिजिटलायझेन शाळा होत असताना, दुसरीकडे मात्र अनेक शाळांची दुरवस्था व नादुरुस्त झाल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा नादुरुस्त शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा समान करावा लागत आहे.

त्यात पावसाळ्यात तुटलेल्या छातांमधून पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे अवघड होत असे. तर, दप्तर भिजून पाठ्यपुस्तके व वह्या भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १७७ शाळांची दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार या शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय घेत, ५ कोटींच्या निधीला मंजुरी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या शाळा चकाचक होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number