रोहित-रुचिरा पुन्हा एकत्र ?

मुंबई, १४ जुलै २०२३, प्रतिनिधी : ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील बिग बजेट कार्यक्रम आहे. बिग बॉस मराठी ४ या पर्वात पहिल्यांदाच रोहित आणि रुचिरा या जोडप्याने एकत्र सहभाग घेतला होता. त्यानंतर कार्यक्रमात झालेल्या वादानंतर ते दोघे विभक्त झाल्याच्या चर्चांना उधाण येऊ लागले होते. दरम्यान आता त्यांच्याबद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री […]

रोहित-रुचिरा पुन्हा एकत्र ?

मुंबई, १४ जुलै २०२३, प्रतिनिधी : ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील बिग बजेट कार्यक्रम आहे. बिग बॉस मराठी ४ या पर्वात पहिल्यांदाच रोहित आणि रुचिरा या जोडप्याने एकत्र सहभाग घेतला होता. त्यानंतर कार्यक्रमात झालेल्या वादानंतर ते दोघे विभक्त झाल्याच्या चर्चांना उधाण येऊ लागले होते. दरम्यान आता त्यांच्याबद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री रुचिराच्या एका पोस्टमुळे या दोघांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. १३ जुलै रोजी रुचिराचा वाढदिवस होता. यावेळी आपल्या वाढदिवसाचे फोटो रुचिराने समाज माध्यमांवर सामायिक केले होते. यावेळी रोहित आणि रुचिराचे चाहते रोहितला शोधत होते. पण त्याने त्या दिवशी काहीच पोस्ट केले नाही. त्यामुळे चाहते निराश झाले.

 
View this post on Instagram
  A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)


पण वाढदिवस झाल्यानंतर रोहितने रुचिरासाठी खास पोस्ट केली आहे . जी पाहून चाहत्यांनाही सुखद धक्का बसला. रोहितने रुचिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण तिच्यासाठी तिचा दिवस खास मजकूर देखील लिहिला.

रोहित वाढदिवसाच्या दिवशी रुचिराला घेऊन रोमॅण्टिक डेटवर घेऊन गेला होता. तेथील फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की ,”हा तुझा दिवस आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.तर फोटोच्या खाली ‘शेवटी जरी आलो असलो तरी स्पेशल एण्ट्री आहे’ असे देखील लिहिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number