Rohit Raut: मराठमोळ्या गायकाची कमाल! रोहित राऊत झाला I-Popstar शोचा विजेता; बक्षीसाची रक्कम वाचून थक्क व्हाल

I-Popstar चा पहिला विजेता ठरून रोहित राऊतने मराठी संगीतविश्वात नवा इतिहास रचला. दमदार परफॉर्मन्स, प्रचंड मतांचा वर्षाव आणि परीक्षकांची प्रशंसा मिळवत त्याने हंगामभर आपली छाप पाडली.

Rohit Raut: मराठमोळ्या गायकाची कमाल! रोहित राऊत झाला I-Popstar शोचा विजेता; बक्षीसाची रक्कम वाचून थक्क व्हाल

Rohit Raut: मराठी संगीतविश्वातील सुप्रसिद्ध गायक रोहित श्याम राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या गायकीचं वर्चस्व सिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या I-Popstar या नव्या म्युझिकल रिअॅलिटी शोचा पहिला विजेता म्हणून रोहितचं नाव जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव सुरू झाला. मराठी संगीत क्षेत्राला नवं रूप देणारा आणि तरुणांना मोठ्या मंचावर चमकण्याची संधी देणारा हा शो रोहितच्या अप्रतिम गायकीमुळे संपूर्ण हंगामभर चर्चेत राहिला.

I-Popstar च्या संपूर्ण प्रवासात रोहितने आपल्या दमदार परफॉर्मन्सने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रत्येक भागामध्ये त्याचा आवाज, त्याची रेंज, त्याचे लाइव सादरीकरण आणि प्रेक्षकांशी तयार होणारा भावनिक संवाद यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर मतांचा पाऊस मिळत राहिला. अंतिम फेरीतही हीच जादू कायम राहिली आणि टॉप २ स्पर्धकांमधील संघर्षात रोहितने निर्णायक आघाडी घेत विजेतेपद आपल्या नावावर केले.

हेही वाचा:Viral Video: 'जर ऐश्वर्या रायचा घटस्फोट झाला तर मी तिच्याशी लग्न करेन ';हे काय बोलून गेले पाकिस्तानचे धर्मगुरू?

रोहित राऊतला मराठी प्रेक्षकांनी सर्वप्रथम ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधून ओळखलं. त्या छोट्या वयातही त्याने ज्या ताकदीने गायन सादर केलं होतं, तेव्हाच त्याच्यातला मोठा कलाकार दिसून येत होता. नंतर विविध कार्यक्रम, लाईव्ह शो, मराठी चित्रपटांमधील गाणी, तसेच रिअॅलिटी शोमध्ये त्याने सतत उत्कृष्ट परफॉर्मन्स देत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

आश्चर्याची बाब म्हणजे, उद्योगात स्थिर नाव मिळाल्यानंतरही रोहितने पुन्हा एकदा स्पर्धेत उतरायचा निर्णय घेतला. आपल्या कलागुणांना अजून पैलू पाडण्यासाठी आणि स्वतःला नवीन पातळीवर सिद्ध करण्यासाठी त्याने I-Popstar मध्ये सहभाग घेतला. हीच धडाडी आणि मेहनत त्याला विजेतेपदापर्यंत घेऊन गेली.

अंतिम फेरीत टीम किंगचा रिषभ पांचाल आणि टीम पर्मिशचा रोहित राऊत हे दोघे स्पर्धक होते. दोघांनीही जोरदार परफॉर्मन्स देऊन वातावरण तापवलं; मात्र प्रेक्षकांचा आणि परीक्षकांचा एकमताने रोहितलाच समर्थन मिळालं. विजेता म्हणून त्याला 7 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर उपविजेता रिषभला ३ लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

हेही वाचा: Kiara Advani – Siddharth Malhotra : कियारा- सिद्धार्थनं जाहीर केलं लेकीचं नाव; नावाचा अर्थही आहे खास

रोहितने विजयाबद्दल बोलताना सांगितलं की, “हा मंच माझ्यासाठी नवीन सुरुवात आहे. मला माझ्या चाहत्यांचं, गुरूंचं आणि कुटुंबियांचं प्रेम मिळालं म्हणूनच इथपर्यंत पोहोचू शकलो. हे यश त्यांचंच आहे.” त्याच्या या विजयानंतर सोशल मीडियावर #RohitRaut आणि #IPopstarWinner हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले. अनेक मराठी कलाकार, संगीत दिग्दर्शक, अभिनेत्यांनीही त्याचे कौतुक करत अभिनंदन केले.

मराठी संगीताच्या भरारीला नवं वळण देणाऱ्या या कार्यक्रमाचा पहिला किताब मराठमोळ्या कलावंताने पटकावल्याने प्रेक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. रोहितचा हा विजयी प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा ठरणार हे निश्चित.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number