मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमात आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रोहिणी खडसेंना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कापूसच्या प्रश्नावरुन शिंदे-फडणवीस यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिला होता. याप्रकरणी खबरदारी म्हणून पोलिसांकडून रोहिणी खडसे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला होता. खडसे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर जळगाव पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि महानगर प्रमुख अशोक लाड वंजारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. रोहिणी खडसेंना ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.