जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातले चोर कधी काय चोरतील हे सांगता येत नाही. पुण्याच्या सिद्धीविनायक मंदिरातून चोरट्यांनी चक्क देवाची मूर्तीच चोरून नेली आहे. पुण्यातल्या लष्कर भागात असलेल्या सिद्धीविनायक मंदिरातून मंगळवारी दुपारच्या सुमारास चोरी झालीय.
मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. त्यांच्याकडून मंदिरातली पंचधातूची मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतलीय. अमर अवघडे असे या आरोपीचे नाव आहे.
देवळाच्या दानपेटीतील पैसे चोरीपासून चोरटे आता देवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचले आहेत.