जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वांद्रेतील उच्चभ्रू परिसरातील महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमिओयाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
जिब्रान सय्यद असं अटक करण्यात आलेल्या रोडरोमियोचं नाव आहे. गेल्या महिन्याभरात त्यानं जवळपास 20 हून अधिक महिलांची छेड काढल्याचा आरोप
आहे.
याप्रकरणी गुरुवारी जिब्रानला खारदांड्याहून अटक करण्यात आली. पाली हिल, माउंट मेरी, बँड स्टँड या ठिकाणांची मुंबईतील उच्चभ्रू वस्तींमध्ये गणती केली जाते.
मात्र, गेल्या महिन्याभरापासून जिब्रान सय्यदची या परिसरातील महिला-तरुणींमध्ये एवढी दहशत पसरली आहे की त्यांनी मॉर्निंग वॉकला जाणेही बंद केले.
या विरोधात महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याची गांभीर्यानं दखल घेत वांद्रे क्राईम ब्रांचनं याप्रकरणी चौकशी करायला सुरुवात केली. पोलीस पथकाने
घटनास्थळावरील महिनाभराच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे रोडरोमिओला अटक करण्यात आली.