‘गावात येऊन दाखवाच’ अमरावतीकरांचं लोकप्रतिनीधींना आव्हान

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून वडाळगव्हाण ते कुंभारगावला जोडणारा रस्ता पक्का करण्याची मागणी होत आहे. हा रस्ता बनविण्याठी भूमिपूजन झाले परंतु लोकप्रतिनिधी वेळ मारून नेत असल्याचं वास्तव समोर आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनीधींना या रस्त्यावरून प्रवास करण्याचं आवाहन गावकऱ्यांनी केलं आहे. ग्रामीण भागात रस्त्याची दुर्दशा ग्रामीण भागातील खराब रस्त्यांची वाट ही काही नवीन […]

‘गावात येऊन दाखवाच’ अमरावतीकरांचं लोकप्रतिनीधींना आव्हान

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून वडाळगव्हाण ते कुंभारगावला जोडणारा रस्ता पक्का करण्याची मागणी होत आहे. हा रस्ता बनविण्याठी भूमिपूजन झाले परंतु लोकप्रतिनिधी वेळ मारून नेत असल्याचं वास्तव समोर आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनीधींना या रस्त्यावरून प्रवास करण्याचं आवाहन गावकऱ्यांनी केलं आहे.

ग्रामीण भागात रस्त्याची दुर्दशा

ग्रामीण भागातील खराब रस्त्यांची वाट ही काही नवीन बाब नाही. मुंबई मध्ये तर रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती असतांना अमरावतील वडाळगव्हाण ते कुंभारगावला जोडणारा रस्ता चिखलाने माखला आहे.

सध्या पाऊस असल्याने या रस्त्यावर चिखल झालेला आहे. जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. चिखलातून ट्रॅक्टर देखील फसतो तर सामान्य नागरीकांचे काय होत असतील हा प्रश्नच आहे.

विशेष म्हणजे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन होऊन देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना या रस्त्यांनी येण्याचे आव्हान केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number