जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ॲड. रिझवान सिद्दीकीची निर्दोश मुक्तता झालीय. यावेळी माझी अटक खरही होती की खोटी हे न्यायालयाच्या ऑर्डर कॉपीमध्येच कळेल अशी प्रतिक्रिया ॲड. रिझवान सिद्धीकीनं दिलीय. तर यावेळी सीडीआर बाबत त्यानं बोलण्यास नकार दिलाय. सीडीआर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांना फटकारल्यानंतर त्याची सुटका करण्यात आलीय.
उच्चन्यायालयाच्या आदेशावरुन माझी मुक्तता झाली आहे मला केलेली अटक हि खरी कि खोटी हि हे न्यालायच्या ऑर्डर कॉपी मध्ये कळेल,सिडीआर बाबत मी काही बोलणार नाही, माझं वयक्तिक काही नसून मला ह्या प्रकरणात जोडलं गेलं होतं. माझ्या क्लाइंट बाबत मी काहि बोलणार नाही, रिजवान सिद्धीकी विरुद्ध पोलीस आणि क्लाइंट बाबत पोलीस असे दोन प्रकरण आहेत.
सिडीआर प्रकरणात मी माझ्या क्लाइंट बाबत काही बोलणार नाही माझ्या क्लाइंट मुळेच मी इथे आहे म्हणुन त्यांच्या बाबत मी काही बोलू शकत नाही आणि यापुढे ही मी माझ्या क्लाइंटला सहकार्य करत राहणार असल्याचंही ॲड. रिझवान सिद्धीकीनं म्हटलयं.