Riyan Parag: हातात ती गोष्ट, तोंडातून धुर…, सामन्यादरम्यान राजस्थानच्या कॅप्टन काय करत होता? आक्षेप घेत नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, आता काय कारवाई होणार?

याशिवाय, ड्रेसिंग रूममध्ये अल्पवयीन आणि नवोदित खेळाडू उपस्थित असल्याचेही सांगितले जात आहे.

Riyan Parag: हातात ती गोष्ट, तोंडातून धुर…, सामन्यादरम्यान राजस्थानच्या कॅप्टन काय करत होता? आक्षेप घेत नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, आता काय कारवाई होणार?

नवी दिल्ली: रियान पराग याच्याभोवती सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राजस्थान रॉयल्स चा कर्णधार असलेला पराग पंजाब किंग्सविरुद्ध 28 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग (सिगारेट ओढणे) करताना दिसल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये पराग ड्रेसिंग रूममध्ये बसून इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा झुरका मारताना दिसतो आहे. विशेष म्हणजे हे सर्व इतर खेळाडूंच्या उपस्थितीत घडले. त्यामुळे केवळ त्याच्यावरच नाही, तर संघ व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण ड्रेसिंग रूममध्ये अशा प्रकारची कृती होणे नियम आणि शिस्तीच्या दृष्टीने गंभीर मानले जाते.

या वादाचे मुख्य कारण म्हणजे भारतात या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी आहे. 2019 मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट कायदा’नुसार व्हेपिंग बेकायदेशीर आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडासह कारावासाचीही तरतूद आहे. त्यामुळे परागची ही कृती केवळ क्रीडा शिस्तीचा भंग नसून कायदेशीर अडचणीही निर्माण करू शकते.

हेही वाचा: Gokul Dudh Sangh: गोकुळ दूध संघाबाबतच्या ‘त्या’ निर्णयासाठी आधी उपमुख्यमंत्री शिंदेचा खोडा; नंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट ‘हा’ निर्णय घेतला

याशिवाय, ड्रेसिंग रूममध्ये अल्पवयीन आणि नवोदित खेळाडू उपस्थित असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे अशा वर्तनाचा चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संघ व्यवस्थापनाने अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित असताना हा प्रकार घडल्याने त्यांच्या भूमिकेवरही टीका होत आहे.

आता या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिस्तभंगाची कारवाई, दंड किंवा इतर कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेमुळे रियान पराग अडचणीत सापडण्याची शक्यता असून, याचा परिणाम त्याच्या प्रतिमेवर आणि संघावरही होऊ शकतो. 

हेही वाचा: Tobacco New Rules: पान मसाला आणि गुटखा प्रेमींसाठी मोठा धक्का! केंद्र सरकारचा नवीन निर्णय काय आहे?, जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number