मराठमोळा “बिग बॉस” शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई हिंदी टेलिव्हिजन विश्वात खळबळ माजवणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता मराठीत देखील येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली. मराठी अभिनेता रितेश देशमुखच्या हाती शोची सूत्रं  दिली जाण्याची शक्यता आहे, कारण, ‘विकता का उत्तर’ या टीव्ही शोचं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं. त्यामुळे बिग बॉस […]

मराठमोळा “बिग बॉस” शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

हिंदी टेलिव्हिजन विश्वात खळबळ माजवणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता मराठीत देखील येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली.

मराठी अभिनेता रितेश देशमुखच्या हाती शोची सूत्रं  दिली जाण्याची शक्यता आहे, कारण, ‘विकता का उत्तर’ या टीव्ही शोचं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं. त्यामुळे बिग बॉस मराठीचा होस्ट म्हणून रितेशला पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर येत्या दोन महिन्यातचं हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता आहे. बिग बॉसचा सेट लोणावळ्यात तयार असल्यामुळे तिथेच शूटिंग होण्याची चिन्हं आहेत.

बिग बॉस मधील टास्क आणि वाद त्यामुळे हा शो नेहमी सर्वांची मन जिंकत आला आहे. हा शो मराठीत आल्यावर कोणकोणते कलाकार यामध्ये सहभागी होणार, त्यांच्यात होणाऱ्या टोकांच्या वादांमुळे हा शो रंगणार का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत.

बिग बॉसच्या अकराव्या पर्वांच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी स्पर्धक विजेता ठरला आहे. त्यानंतर लागलीच ‘मराठी बिग बॉस’ची घोषणा हा योगायोग म्हणावा लागेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number